धाराशिव (प्रतिनिधी)- मराठ्यांचे क्रांतीसुर्य, मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान करणारे क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार दिनांक 23 मार्च रोजी सकल मराठा समाज जिल्हा कार्यालय धाराशिव येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मराठा महासंघाचे जिल्हा सचिव खंडू राऊत यांनी अण्णासाहेबांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संकेत सूर्यवंशी, विष्णू इंगळे, गणेश साळुंखे, पत्रकार पांडुरंग मते सह समाज बांधव यावेळी उपस्थित होते.


 
Top