तेर( प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील कृषी सेवा दुकानदार संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी तेर येथील आकाश नाईकवाडी तर केशेगाव येथील गणेश जाधव यांची उपअध्यक्षपदी सर्वानमते निवड  धाराशिव येथील कृषी सेवा दुकानदाराच्या बैठकीत हि निवड सर्वानमते करण्यात आली आहे. 

धाराशिव कृषी सेवा संस्था यांच्या वतीने धाराशिव येथे  तालुक्यातील सर्वच कृषी दुकानदार यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत नुतन संघटना मजबूत करणे,कृषी सेवा केंद्र चालकांच्या विषयक नवनवीन आडचणी  संदर्भात तसेच रासायनिक खते लिंकींग मटेरियल,ऑनलाईन लाईन्स आदि विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली त्यानंतर धाराशिव तालुका कृषी सेवा संघटनेच्या कार्यकारणीची निवड यामध्ये तेर येथील आकाश नाईकवाडी यांची अध्यक्षपदी तर चिखली  येथील गणेश जाधव उपअध्यक्षपदी तसेच सचिवपदी धाराशिव येथील ज्ञानेश्वर सुर्यवंशी,कार्याध्यक्ष देवळाली येथील मेहराज शेख,कोषाध्यक्ष लासोना येथील राहुल कदम तर सल्लागार जागजी येथील शरद हावुळ यांची सर्वानमते निवड करण्यात आली नुतन कार्यकारणीचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कृषी सेवा संस्था धाराशिव  संस्थापक अध्यक्ष नवनाथ  जाधवर, विलास राठोड,संग्राम जगताप, दत्ता घुले,दिपक शेंडगे,सुरेश कदम,दादा देशमुख, मनोज सावंत, हरिचंद्र डोके,नवनाथ भुसारे,दिपक इंगळे,संतोष गाढवे,मनोज गुरव,मारुती चौरे,युवराज पवार,विकास वाघ , यांच्यासह तालुक्यातील कृषी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top