धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल, धाराशिव येथे धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस.बी.एन.एम. कॉलेज ऑफ फार्मसी व आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने डी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता “औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील करियर व व्यवसाय संधी“ याबाबत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्लोबल फार्मा अकॅडेमी चे संस्थापक अमित माने व अम्पिम-एक्स इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीचे संचालक ॲड. अमोल पाटील, एस.बी.एन.एम. कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. सूरज ननवरे, आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गाझी शेख व डी. फार्मसीचे विभाग प्रमुख प्रा. सुबोध कांबळे उपस्थित होते.

अमित माने यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी इंडस्ट्री मध्ये करियर संदर्भातील विविध उपलब्ध संधी, त्याकरिता आवश्यक विविध कौशल्य आधारित कोर्सेस याबाबत माहिती सांगितली तसेच विद्यार्थ्यांनी नोकरीच्या संधी कशा शोधल्या जातात त्याकरिता स्वतःचा बायोडाटा कशा पध्दतीने बनवावा तसेच मुलाखतीची तयारी कशा प्रकारे करावी याबाबत मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांनी स्वतः मध्ये आत्मविश्वास वाढवून इंडस्ट्री क्षेत्रात पदार्पण केल्यास यश संपादन करता येईल, असे आवाहन केले. ॲड. अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांना औषध निर्मिती क्षेत्रात भारत देश अग्रेसर असून भविष्यात फार्मसी मार्केटिंग व औषध निर्यात क्षेत्रात उपलब्ध विविध संधी तसेच औषध आयात-निर्यात व्यवसाय सुरू करण्याकरिता आवश्यक विविध तांत्रिक प्रक्रिया याबाबत स्व-अनुभव कथन करीत मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांनी व्यवसाय क्षेत्राची निवड केल्यास जिद्द, चिकाटी व मेहनत या जोरावर नक्कीच यश प्राप्त होईल त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यवसाय क्षेत्र निवडून स्वतःचे भविष्य घडवावे व पालकांचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. सिद्धि बसाटे यांनी केले, प्रास्ताविक प्रा. अमोल मोरे व प्रा. अमर माने यांनी केले व आभार प्रदर्शन विभाग प्रमुख प्रा. सुबोध कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्याकरिता महाविद्यालयातील प्रा. नितिन सातपुते, प्रा. शीतल केदार, प्रा. वैभव रेडे, प्रा. रितिका पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top