धाराशिव (प्रतिनिधी) - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रसेना प्रतिष्ठान मध्यवर्ती भीमजयंतीउत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी निखिल शिंदे, उपाध्यक्ष आकाश वाघमारे तर सचिवपदी रूपेश बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसेना प्रतिष्ठान मध्यवर्ती भीमजयंती उत्सव समितीच्यावतीने विविध उपक्रम व मिरवणूक उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी निखिल शिंदे, उपाध्यक्ष आकाश वाघमारे, सचिव रूपेश बनसोडे, सहसचिव शमीत सरवदे, कार्याध्यक्ष जीवन भालशंकर, कोषाध्यक्ष प्रज्योत बनसोडे, प्रसिध्दीप्रमुख अजिंक्य जानराव, शैलेश गडबडे, सांस्कृतिक प्रमुख सोनू सरवदे, शाहूराज धावारे, विशाल सरवदे, धन्यकुमार क्षीरसागर, शब्बीर शेख, अजित बनसोडे, सल्लागार कुमार ओहळ, राजाभाऊ जानराव, आनंद विधाते, करण वाघमारे, महेश ओहळ, मिरवणूक प्रमुख महादेव भोसले, पृथ्वीराज सरवदे, चेतन माळाले, अमर विधाते, कैलास लोंढे, सचिन डोंगरे, सुमित क्षीरसागर, प्रीतम शिंगाडे, अक्षय बनसोडे, महेश डावरे, मनोज वाघमारे,विशाल बनसोडे, मार्गदर्शक म्हणून अरुण बनसोडे, कमलाकर बनसोडे, खंबीर साथ बाळासाहेब बनसोडे, निलेश भोसले, श्याम जहागीरदार, संयोजक नागराज साबळे, शैलेंद्र शिंगाडे, आयोजक म्हणून संदीप बनसोडे यांची सर्वानुमते निवड झाली आहे. निवड झालेल्या सर्व पदाधिकारी, सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.