तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागनंदा मगरे यांची पिंपळगाव बसवंत जि.नाशिक येथील  ग्रामीण रुग्णालयात बदली झाल्याबद्दल तेर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने त्यांना निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी  कार्यालयीन अधिक्षक अमोल आंग्रे, डॉ.संगमेश्वर धोंगडे, डॉ.महेश पाटील, रूग्न कल्याण समितीचे सदस्य जुनेद मोमीन,दत्तात्रय वाघ सुनिता चव्हाण,निता काळूंके, संगिता गुळवे, भाग्यश्री कोळी, संतोष सरवदे, स्वप्निल माने,मिमोह अडसूळ, प्रभाकर बोंदर, गणपती चौरे, रमेश कंडारे, गजेंद्र साळुंके, प्रदिप घुटे,बुद्धभूषण माने,नियाज शेख, सुनिल पडवळ आदी उपस्थित होते.


 
Top