धाराशिव (प्रतिनिधी)-शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत धाराशिव मधील समता नगर येथे काल रस्त्याच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला.सदर योजनेअंतर्गत समता नगरमध्ये छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक रस्ता (कामाची किंमत -73.93 लक्ष), विसर्जन विहीर ते सुधीर पाटील यांच्या घरापर्यंत हॉटमिक्स रस्ता(67.91 लक्ष), प्रभात पतपेढी ते पुष्पक मंगल कार्यालयापर्यंत हॉटमिक्स रस्ता.(28 लक्ष) या रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन  धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर ,धाराशिव कळंबचे मतदासंघांचे लाडके आमदार कैलास पाटील तसेच माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आणि हॉटेल पुष्पक पार्कचे अनिल नायकवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत समता नगरमधील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून या विकासकामांचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी सर्वांच्या वतीने खासदार श्री ओमराजे निंबाळकर साहेब,आमदार श्री.कैलास भैया पाटील श्री मकरंद राजे निंबाळकर आणि श्री अनिल नायकवाडी यांचा हार घालून भव्य सत्कार करण्यात आला. 

दुपारच्या वेळी तीव्र उन असूनही या विकास कामाच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ नागरिकांची असलेली उपस्थिती कौतुक करण्याजोगी होती.सदर रस्ते हे शहरातील वर्दळीच्या असलेल्या समता नगर परिसरातील असून या कामामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. सदर कामाची सुरूवात लवकरच होणार असून या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

सदर कार्यक्रमास पारीजातक आपारमेंट सोसायटीचे अध्यक्ष वाघ, श्री वेणुगोपाल मंञी, श्री आजमेरा, श्री रवी शितोळे, इक्राम सय्यद,श्री विक्रम ईगळे,श्री आशोक माणे,सिद्दीकी सय्यद सरशिवसैनिक श्री आभिजीत बुलबुले,शिवसेना शहरप्रमुख श्री सोमनाथ गुरव ,शिवसेना उपशहर प्रमुख श्री बंडूभैय्या आदरकर,माजी नगरसेवक  रवी वाघमारे ,समता गृहनिर्माण सहकारी सोसायटी चे अध्यक्ष श्री नाना घाटगे व सचिव श्री पकंज पडवळ ,संचालक श्री गोविंद वेदपाठक,संचालक श्री ऑ आतुल पाटील ,श्री बशीर ताबोळी सर,श्री महेश काटे,श्री विवेक गोवर्धन,श्री मनसुर काझी,श्री बन्टी कादरी ,श्री मनोज केजकर,बाळासाहेब वरूडकर व परीसरातील ईतर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top