धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील शिंगोली येथील सरस्वती विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सादरीकरण करून धमाल केली. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी बालविवाह आणि मोबाईलचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती केली. 

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी केंद्रप्रमुख माननीय नागटिळक व पोलीस हवालदार अविनाश शिंदे, शिंगोली गावच्या सरपंच सौ योगिता शिंदे, उपसरपंच मनोज मगर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष मधुकर शिंदे, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे संघटन मंत्री उमाकांत कुलकर्णी, शिंगोली गावातील युवा नेते राहुल शिंदे, गोर्टेकर, सुकाळे,पोतदार सर, गणपत मगर, तसेच संस्थापक अध्यक्ष आबासाहेब रणखांब, कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका गोरे पल्लवी मॅडम, चौधरी सर  कुमंत शिंदे उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्ग, स्वाती करंजकर, सारिका गाढवे, मनीषा वाघमारे, अंजली वाघमारे, सुलताना पठाण, प्रिया इंगळे, पुनम घोगरे, पल्लवी पवार, गोवर्धन शिंदे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर केले, यामध्ये कोळीगीते, शेतकरी गीते, चित्रपट गीते, बालगीतांनी प्रेक्षकांची मने वेधून घेतली. तसेच या स्नेसंमेलनाचे मुख्य आकर्षण आजी नातवंडचा भावनिक नृत्य सादरीकरण करून प्रेक्षकांचे मने जिंकली समस्त शिंगोली ग्रामस्थ उपळा गावाचे ग्रामस्थ आळणी व जहागीरदारवाडी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रास्ताविक गोरे मॅडम यांनी केले.  केंद्रप्रमुख नागटिळक यांनी शुभेच्छा मार्गदर्शन केले. सूत्र संचालन बसवेश्वर थोटे  व आभार गाढवे मॅडम यांनी मानले.


 
Top