तुळजापूर (प्रतिनिधी)- टाटा सामाजिक विज्ञान संस्थान,  तुळजापुर येथे दिनांक 17 ते 19 मार्च 2024 रोजी 14 व्या राष्ट्रीय ग्रामीण युवा महोत्सवाचे आयोजन  प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये  “सिंगिग द बैलडस ऑफ अनसंग“ ही थीम घेवून राष्ट्रीय ग्रामीण   ग्रामीण युवक महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवा अतंर्गत विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  महिला मेळावा, सरपंच मेळावा (विषय:- दुष्काळ निर्मूलनामध्ये ग्रामपंचायत व समुदायाची भुमिका) ग्रामयात्रा, अन्न (फुड) महोत्सव “रुचिरा“ आणि रक्तदान शिबिर “हिमोबीट्स“ त्याच बरोबरच विविध आंतरविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये क्लासिकल, बॉलिवूड गायन व नृत्य स्पर्धा , क्रीडा स्पर्धा आणि वाङ्मयीन स्पर्धा इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे.

तुळजापूर कॅम्पस ग्रामीण युवकांच्या या भव्य सिम्फनीमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. हा महोत्सव विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि भाग घेण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो. या समृद्ध अनुभवामध्ये सहभागी होण्याची आणि ग्रामीण संस्कृती साजरी करण्यासाठी 14 व्या राष्ट्रीय ग्रामीण युवा महोत्सव  तुळजापूर कॅम्पसमध्ये मध्ये सहभागी व्हावे असे अवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात येते. सहभागाबद्दल अधिक माहिती आणि तपशिलांसाठी, कृपया  तुळजापूर कॅम्पस www.nryf.co.in या वेबसाइटला भेट द्या.


 
Top