धाराशिव (प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक कार्यालय येथे नेमणुकीस असलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबल संगीता चव्हाण/ पवार या खो-खोच्या राष्ट्रीय खेळाडू आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये धाराशिवचे व धाराशिव पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करून धाराशिव जिल्ह्याची मान अभिमानाने ताठ केली आहे. तसेच यावर्षी होणाऱ्या राष्ट्रीय खो खो स्पर्धा दिल्ली( नॅशनल) साठी महाराष्ट्र महिला खो-खो संघात निवड झाली आहे.  

पोलीस हेडकॉन्स्टेबल व  खो-खो च्या राष्ट्रीय खेळाडू सौ संगीता चव्हाण/ पवार यांची निवड  झाल्या बद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व पोलीस उपाधीक्षक हसन गौर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच  सहकारी बॅचमेंट (2008) पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे. ही स्पर्धा दिनांक 28 मार्च 2024 ते 2 एप्रिल 2024 अशी दिल्ली येथे होणार आहे.

 

 
Top