तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील आलियाबाद येथे बंजारा समाजाकडून होळी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो वर्षांपासून चालत आलेली गोर बंजारा संस्कृती आजही बंजारा समाजामध्ये जपतो आहे. बंजारा समाजाचे मुख्यतः होळी आणि दिवाळी हे मुख्य सन असतात. दोन्ही सनाचे  विशेष महत्त्व आहे.

होळी सणामध्ये पारंपरिक गीत ज्याला “लेंगी“ म्हणटले जाते. लेंगीच्या माध्यमातून निसर्ग प्रेम,शुर राजा, महाराजांच्या कहाण्या, सामाजिक संदेश,गोर संस्कृती, देशासाठी शहीद झालेल्या शहीदावर व नवनवीन घडामोडींवर गीताच्या रुपाने महत्त्व सांगितले जाते. आज पहाटे  आलियाबाद येथे गावातील स्त्री,पुरुष एकत्रित येऊन लेंगी गीत म्हणत होळी महोत्सव साजरा केला. यावेळी माजी सभापती तथा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, गुजरात, महाराष्ट्र, गोवा राज्याचे पच्शिम धर्मजागरण क्षेत्र प्रमुख रामानंद काळे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, सरपंच सुर्यकांत चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण, तंटामुक्ती समिती अध्यक्ष विनायक चव्हाण, शिवाजी चव्हाण पोलीस पाटील, सुभाष नाईक, माणिक राठोड हरीदास राठोड, मोतीराम राठोड,रेवापा राठोड, शिवाजी चव्हाण,रेखु राठोड,हरीदास चव्हाण, रतन चव्हाण,सुनील चव्हाण,अरुण चव्हाण, विक्रम चव्हाण, यांच्या सह महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top