धाराशिव (प्रतिनिधी)-पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी  यांनी अवैध धंद्यावर व गोवंशीय जनावराची अवैध कत्तल व वाहतुक रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. दि.26.03.2024 रोजी परंडा येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यासाठी  जनावरे बांधून ठेवले असल्याची गोपनीय माहिती  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरुन विशेष पोलीस पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या पथकाने  दि. 26 मार्च  रोजी परंडा गावातील पाचपिंपळा रोडलगत बंद असलेल्या हॉटेलच्या पाठीमागे रवाना होउन दुपारी 16.30 वा. सु. छापा टाकला.

सदर छापा कारवाई मध्ये मुजावर गल्ली, परंडा  येथे राहणारा इसम नामे अलीशर मैनुद्दीन कुरेशी, वय 60 वर्षे, गौस अलीशर कुरेशी, वय 23 वर्षे हे दोघे हा त्याचे स्वत:चे पाचपिंपळा रोडलगत बंद असलेल्या हॉटेलच्या पाठीमागे गोवंशीय 14 जनावरे, वासरे त्याच्या ताब्यात कत्तलीसाठी बांधलेले मिळुन आले. यावर पथकाने मिळून आलेले गोवंशीय जनावरे/वासरे असा एकुण 2 लाख 63 हजार रूपये किंमतीचे जप्त केले. यावर पोलीस अंमलदार बबन चंद्रकांत जाधवर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन  महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5(अ), (1), 9, 9 (अ), कलम 11(1) (डी) (ई) (एच) प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम  अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगीरी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली  गुन्हे शाखचेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, विशेष पोलीस पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हावलदार विनोद जानराव, समाधान वाघमारे, पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस अंमलदार किवंडे यांच्या पथकाने केली आहे.


 
Top