धाराशिव (प्रतिनिधी)-ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन या (एआईएमआईएम) पक्षाच्या धाराशिव  जिल्हाध्यक्षपदी बेंबळी येथील सिद्दिक इब्राहिम उर्फ गोलाभाई बौडीवाले यांची निवड करण्यात आली आहे.

एआईएमआईएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जालील यांनी ट्विटरवरून घोषणा केली आहे. सर्व समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी काम करून सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असुदिद्दिन ओवैसि यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम कराल अशी आशा बाळगून गोलाभाई यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


 
Top