धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती' वर निमंत्रित सदस्य म्हणून युवराज नळे व डॉ. सतीश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील साहित्यिक इतिहास व पुरातत्त्व संशोधक युवराज नळे तसेच इतिहास तज्ञ डॉक्टर सतीश कदम या दोघांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीवर निवड करण्यात आली आहे.  महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने तसा शासन निर्णय महाराष्ट्र राज्याचे उपसचिव अशोक मांडे यांनी दिनांक 16 मार्च 2024 रोजी निर्गमित केला आहे. 
 
Top