तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरात पाणी भरल्यानंतर पाणी नासाडी केल्यास  1 हजार रुपये दंड करण्याचा इषारा नुतन मुख्याधिकारी प्रियंवदा म्हाडदाळकर यांनी  दिला आहे.

तुळजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या  कुरनूर प्रकल्पामध्ये या वर्षीच्या कमी पर्जन्यमानामुळे धरणामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कमी पाणीसाठा उपलब्ध असल्याने तुळजापूर शहरात मागील काही दिवसापासुन तीन दिवसआड पाणी पुरवठा सुरु केला आहे. तुळजापूर शहर हे तीर्थ क्षेत्राचे ठिकाण असल्याने तुळजापूर शहरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता जास्तीचा पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. परंतु नैसर्गिक आपत्ती असल्याने ना इलाजास्तव व प्रशासनाने वरीलप्रमाणे निर्णय घेतला आहे. काहि भागातील नागरिकांनी  आपले पाणी भरणा झाल्यास नळास तोटी लावण्यात यावी व यापुढील कालावधीत कोणत्या परिस्थितीत पाण्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा तसे निदर्शनास आल्यास पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांकडून 1 हजार रूपये इतका दंड वसूल करण्यात येईल याची नोंद घावी.

तरी सद्याची परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा वापर जपून करून प्रशासनास सहकार्य करावे. याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन (भा.प्र.से) मुख्याधिकारी नगरपरिषद तुळजापूर प्रियंवदा म्हाडदळकर यांनी केले आहे.


 
Top