तुळजापूर (प्रतिनिधी)-नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रियवंदा म्हाडदाळकर यांनी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ तुळजापूर या संस्थेस सदिच्छ भेट दिली.

यावेळी पुजारी बांधवाच्या वतीने शहराविषयी विविध समस्या मांडल्या. रामदरा तलावातुन शहरासाठी नविन पाणी पुरवठा, पार्किंगकडे जाणारे वाहनांसाठी वाहनाना वाहनतळास वेगवेगळी नांवे देवुन त्याठिकाणी प्रत्येक भागातील पार्किंगकडे वाहने सोडण्यासाठी क्रमांक देण्यात यावेत. शहरातील विविध भागातील ठिकाणांची नावे देवुन बोर्ड लावण्यात यावेत. त्यासाठी पुजारी मंडळ आर्थिक मदत करेल. पार्किंगकडे जाणारे मार्ग हे वनवे करण्यात यावीत. तसेच यात्रा मैदान भागातील रुममध्ये सर्व सुविधा मिळाव्यात अशा अपेक्षा व्यक्त केल्या. 

यावेळी मंडळाकडुन मालमत्ता कर व नळ पट्टी पोटी रु. 108000/- कराचा चेक त्यांच्याकडे सुपुर्द केला. त्यावेळी मंडळाच्या वतीने प्रियवंदा म्हाडदाळकर यांचा सत्कार करण्यात आला. मंडळानी केलेल्या सुचनांची निश्चितपणे पाठपुरावा करुन आंमलात आणण्यासाठी प्रयत्न करेण असे आश्वासन दिले. या वेळी पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे, कोषाध्यक्ष किरण क्षिरसागर, संचालक प्रा. धनंजय लोंढे, शांताराम पेंदे, कल्याणराव भोसले, सचिन कदम, योगेश रोचकरी, शिवाजी बोधले, बाळासाहेब भोसले हे सर्व उपस्थित होते.


 
Top