पुणे (प्रतिनिधी)- वैभवशाली होळकरशाहीचे संस्थापक आणि मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार फडकवणारे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या 231 व्या जयंती सोहळ्याचे आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा मल्हाररत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.  विशेषतः या कार्यक्रमात हिंदकेसरी समाधान वाघमोडे तसेच महाराष्ट्र केसरी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे.  अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक तथा पुण्यश्लोक फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले यांनी दिली आहे. 

सदर कार्यक्रम रविवारी 17 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह, घोले रोड, पुणे येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत श्रीपाल सबणीस, आयकर आयुक्त नितिन वाघमोडे, अर्जुन पुरस्कार विजेते पै. काकासाहेब पवार, व शांताराम जाधव, अमरजीत राजे बारगळ, महिला बालकल्याण उपयुक्त दिलीप हिवराळे, क्रीडा उप संचालक अनिल चोरमले, एन बी मोटे, हिंदकेसरी अभिजीत कटके, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदचे हनुमंत गावडे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे दत्तात्रय बंडगर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शंकर कृष्णाजी काटे, उद्योजक दीपक आबा करगळ, उद्योजक रमेश शेठ लबडे, उद्योजक अनिल राऊत,उद्योजक विवेक बिडगर, युवा व्याख्याते लक्ष्मण नजन यांच्यासह अनेक क्रीडा अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने संयोजक धनंजय तानले, पै. काळूराम कवितके, रोहिदास गोरे, गोविंद वलेकर, नागेश तितर, सोमनाथ नजन, डॉ. झुंजारराब बदडे संतोष वाघमोडे भुजंगराब दुधाळे, रुक्मिणी धर्मे, रेश्मा घोडके/खरात, रोहित पांढरे राजेंद्र गाडेकर, दिप्ती तानले, मयुर मोरे यांनी केले आहे.  

या खेळाडूंचा व मान्यवरांचा होणार मल्हाररत्न पुरस्कार देऊन सन्मान

पै. समाधान वाघमोडे, हिंदकेसरी 2024, पै. बापु लोखंडे शिवछत्रपती पुरस्कार विजेते, कुस्ती, पें. नामदेव बडरे शिवछत्रपती पुरस्कार विजेते, कुस्ती, पै. अतुल पाटील शिवछत्रपती पुरस्कार विजेते, कुस्ती, पै. उमेश सुळ शिवछत्रपती पुरस्कार विजेते, कुस्ती, पै. उत्कर्ष काळे शिवछत्रपती पुरस्कार विजेते, कुस्ती, रेश्मा पाटील (पीएसआय) शिवछत्रपती पुरस्कार विजेते, स्वाती गाढवे शिवछत्रपती पुरस्कार विजेती, ॲथलेटिक्स, रेश्मा पुणेकर शिवछत्रपती पुरस्कार विजेती, बेसबॉल, पै. अमृता पुजारी महाराष्ट्र केसरी, कुस्ती, पै. गोरख सरकार महाराष्ट्र केसरी, कुर्ती, ऋतुजा पिसाळ आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती, हॉकी,अक्षता ठेकळे आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती, हॉकी, संदीप सरगर आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता, भालाफेक, राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती, बॉक्सिंग, पै. सागर मारकड राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता, कुस्ती, पै. बैष्णवी कुशाप्पा, राष्ट्रीय पदक विजेती, कुस्ती, समृद्धी डाळे महाराष्ट्र महिला क्रिकेट खेळाडू, संकेत सरगर, आंतरराष्ट्रीय पदक बिजेता, वेटलिफ्टींग, तेजस शेळके, आंतरराष्ट्रीय विजेता (ॲथलेटीक्स), रेखा धनगर, राष्ट्रीय पदक विजेती, (बेसबॉल), ओंकार सोनटक्के, राष्ट्रीय पदक विजेता (कुस्ती), चंद्रकांत सनगर (उपसचिव मंत्रालय सेवानिवृत्त), नरसिंग भंडे, (कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग), राजेंद्र भानसे, (सह दुय्यम निबंधक वर्ग 2), सुरेश बंडगर उपोषणकर्ते, अण्णासाहेब रुपनवर, उपोषणकर्ते, गणेश पुजारी,  संपादक - साप्ताहिक पुण्यश्लोक, धनंजय सोलंकर, कवी, डॉ. योगेश गेठे, मा. वैद्यकीय संचालक शिर्डी देवस्थान, अंकुश भांड, अध्यक्ष : अखिल भारतीय धनगर समाज संस्था, पुणे.


 
Top