भूम (प्रतिनिधी)-डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात आपल्या रविंद्र हायस्कूलने तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावत पुन्हा एकदा यशाचा झेंडा रोवला. 

या अभियानात तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर असे मूल्यांकन करण्यात आले होते. या मूल्यांकनात तालुकास्तर व जिल्हा स्तर मिळून आठ लाख रुपये रकमेच्या बक्षिसाची शाळा मानकरी ठरली आहे. हे यश सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्या अथक परिश्रमातून मिळाले. या यशाचे जिल्ह्यात सर्व स्तरातून प्रशालेचे अभिनंदन व कौतुक होत आहे.


 
Top