सोलापूर (प्रतिनिधी)-श्री राम करण यादव महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी 30 मार्च 2024 रोजी सोलापूर रेल्वे स्टेशनची  व्यापक केली.

त्यामध्ये अमृत स्टेशन अंतर्गत होणाऱ्या कामाची पाहणी केली. जसे सोलापूर रेल्वे स्टेशन परिसर, कार पार्किंग, नवीन , स्टेशनच्या मागील रामवाडीच्या बाजूचे नवीन प्रवासी गेट, विभागीय ट्रेनिंग सेंटरचे काम, प्लेट फार्म दोनची पाहणी, त्यामधील रेल्वे ट्रॅक वरील स्वच्छाता, पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन आणि वेस्टेज पाण्याची पाईप लाईनची पाहणी, लोको पायलट लॉबी, तिकीट निरीक्षक लॉबी,  वेटिंग रूम, एक स्टेशन एक उत्पादन,  मशीन, बुकिंग कार्यालयची  सखोल पाहणी केली. 

यावेळी सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री. नीरज कुमार दोहारे, अप्पर विभागीय व्यवस्थापक श्री. शैलेंद्र सिंह परिहार, गती शक्ती युनिटचे व्यस्थापक श्री. अवनीश वर्मा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यस्थापक श्री. योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) श्री. चंद्रभूषण आणि सोलापूर विभागातील अन्य अधिकारी उपस्थित  होते.


 
Top