धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव येथिल स्वयंवर मंगल कार्यालय येथे दोन एप्रिल पासून श्री संत गोरोबा काका यांच्या 707 व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त चरित्र कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही कथा 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2024 दरम्यान हभप श्री दीपकजी खरात महाराज यांच्या सुश्राव्य व समधुर वाणीने संपन्न होणार आहे. या सात दिवस दररोज चालणाऱ्या कथेची वेळ सायंकाळ 4 ते 7 पर्यंत असेल. 

दि. दोन एप्रिलला सकाळी 8:30 वाजता शहरात शोभा यात्रा काढण्यात येणार असून संत गोरोबा काका याच्या जिवनावर सुंदर देखावे करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील महिला भजनीमंडळ व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित राहणार आहेत.  तसेच दिनांक 7 एप्रिलला श्री संत गोरोबा काका संत साहित्य संमेलन घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. या साहित्य संमेलनात संत गोरोबा काका यांच्या जीवनावर परिसंवाद, कवी संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. 

या चरित्र कथेची सांगता दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी 9:00 वाजता होणार आहे. दररोज चरित्र कथेनंतर व सांगता समारंभा नंतर भक्ताना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संत श्री गोरोबा काका सेवा समिती, धाराशिव यांचे श्यामराव दहिटणकर, हभप ईश्वर महाराज कुंभार, श्रीकृष्ण देशमुख व प्रा. सोमनाथ लांडगे यांनी अवाहन केले आहे.


 
Top