धाराशिव (प्रतिनिधी)- साहित्यिक लेखक कवी आणि दलित चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच पर्यटन विकास समितीचे सदस्य विजय साहेबराव गायकवाड यांना नुकताच समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट असा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पर्यटन विकास समिती व कला आविष्कारच्या वतीने शाल, पुष्पहार,शाही टोपी घालून सत्कार करण्यात आला.तर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान उद्देशिका शिल्पासमोर समाज बांधवांच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला.त्यांच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली, तसेच महासंस्कृती महोत्सवात पर्यटन जनजागृती संस्था धाराशिव संचलित पर्यटन विकास समितीच्या वतीने पुरातत्वीय व पर्यटन स्थळाविषयी माहिती चित्र प्रदर्शन भरविण्यात आले होते त्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले होते त्याचे वितरण या कार्यक्रमात करण्यात आले.पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे यांच्या सह आपापल्या मनोगतात विजय गायकवाड यांच्या सामाजिक चळवळीतील घटनेस उजाळा दिला, यावेळी पर्यटन जनजागृती संस्था धाराशिव संचलित पर्यटन विकास समितीचे मार्गदर्शक डॉ,अभय शहापुरकर,अध्यक्ष युवराज नळे सचिव देविदास पाठक,ए एन देशमुख, दलित मित्र शंकर खुने,अब्दुल लतिफ,राजेंद्र अत्रे, हणुमंत पडवळ, शेषनाथ वाघ,गणेश रानबा वाघमारे,बाबासाहेब गुळीग,विक्रांत नळे निश्चल बोंदर,प्रदीप वाघचौरे,राजेंद्र धावारे,संजय गजधने,दिपक पांढरे,श्रीकांत गायकवाड,आरपीआय (आं) चे संदिप कटाबु,सोमनाथ गायकवाड,कैलास शिंदे, महादेव एडके, दुष्यंत बनसोडे अन्य इतर उपस्थित होते.


 
Top