धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आज ओबीसी सेल व आदिवासी सेल च्या पदाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.

तसेच जिल्हयातील  नेतृत्व प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यतत्पर जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे  यांच्या  हस्ते व लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी, आदिवासीं सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे ओबीसी विभाग व आदिवासीं सेल धाराशिवच्या आज निवडी पार पडल्या.

यामध्ये ओबीसी विभाग धाराशिव जिल्हा सरचिणीस पदी इतापे सोमनाथ सीताराम, ओबीसी जिल्हा उपाध्यक्षपदी माळी अतुल भालचंद्र, सांगोळे गणेश अभिमान,ओबीसी भूम तालुकाध्यक्ष पदी वणवे अभिजीत शेषेराव,भूम तालुकाकार्याध्यक्ष पदी कुटे दीपक जगन्नाथ, ओबीसी परांडा तालुकाध्यक्ष पदी सायकर अर्जुन भीमराव,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदिवासी सेल धाराशिव जिल्हा संघटक पदी संतोष बालाजी काळे,आदिवासी सेल वाशी तालुका उपाध्यक्ष पदी सिकंदर पवार, आदिवासी सेल कळंब तालुका उपाध्य पदी लक्ष्मण शिवाजी काळे, आदिवासी सेल कळंब तालुका सचिव पदी बबन आप्पा काळे यांना प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे यांच्या हस्ते नियुक्ती पात्र देऊन नियुक्ती देण्यात आली. नव नियुक्त पदाधिकारी यांचा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार व जिल्हाध्यक्ष्‌‍ महेंद्र धुरगुडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी महीला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने,वाशी आदिवासीं सेल तालुकाध्यक्ष विशाल काळे, धाराशिव महिला तालुका उपाध्यक्ष उषा लगाडे, धाराशिव शहर महीला शहराध्यक्षा सुलोचना जाधव,अंबेजवळगा जि.प गट प्रमुख सुरेश राठोड, केषेगाव जिप गट प्रमुख लिंबराज लोखंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.


 
Top