तुळजापूर (प्रतिनिधी)- मुख्यमंञी एकनाथ शिंदेनी दाखवलेली हिम्मत उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांची ताकदपुर्ण नियोजन व उपमुख्यमंञी अजित पवार वेगळी ताकद लावल्यामुळे महायुती सरकार अस्तित्वात येवुन रेल्वेसह नवनवीन प्रकल्प हाती घेत असल्याचे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

नगरपरिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतील 158 कोटींच्या रस्ते विकास प्रकल्पाचा उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी युवा नेते विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नारायण नन्नवरे, तालुकाध्यक्ष  संतोष बोबडे, बाळासाहेब शिंदे, आनंद कंदले, शांताराम पेंदे, सचिन पाटील, अमरराजे परमेश्वर, सज्जनराव साळुंके, किशोर गंगणे, विशाल रोचकरी, गोकुळ शिंदे, श्रीकृष्ण सुर्यवंशी, आनंद पांडागळे, नागेश नाईक, तानाजीराव कदम,गोकुळ शिंदे, पंडितराव जगदाळे, किशोर साठे, अमर  हंगरगेकर, नानासाहेब लोंढे, विनोद पलंगे, संभाजी पलंगे, नरसिंग बोधले, माऊली भोसले, बापूसाहेब भोसले, औदुंबर कदम, महेश चोपदार, विजय  कंदले, राजेश्वर कदम, लखन पेंदे, नरेश अमृतराव, आनंद पांडागळे, संजय शितोळे व्यासपीठावर उपस्थितीत होते. 

यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की. येत्या पावसाळ्यात कृष्णा खो-यातील पाणी रामदऱ्यात पाणी येणार आहे तालुक्यात सहा एमआयडीसी उभारल्या जाणार आहेत. त्यात तामलवाडी येथे 350 एकरवर असुन येथे सोलापूरचे उद्योजक येण्यास तयार आहेत. 


 
Top