धाराशिव (प्रतिनिधी) - शहरांमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासह गटारींची साफसफाई काढण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा प्रचंड सामना करावा लागत आहे. तर अनेक नागरिक अस्वच्छतेबाबत नगर परिषदेकडे वारंवार मागणी, निवेदने व आंदोलने करीत आहेत. त्यामुळे शहरवासियांची अस्वच्छतेपासून मुक्तता व्हावी, यासाठी प्रत्येक प्रभाग निहाय व्यक्तींची नेमणूक केली असून त्यांच्यावर स्वच्छता करून घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे अस्वच्छते बाबत त्यांच्याकडे नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी त्यांचे संपर्क नंबर देखील देण्यात आलेले आहेत.

धाराशिव नगर परिषदेच्यावतीने स्वच्छता करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी यांची विशेष बैठक लावली होती. त्यावेळी नागरिकांनी शहरातील अस्वच्छतेविषयी जिल्हाधिकारी यांच्यासमोर पाढाच वाचला होता. जिल्हाधिकारींनी देखील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन स्वच्छतेचे नियोजन लवकरच करण्याच्या सूचना मुख्याधिकारी वसुधा फड यांना दिल्या होत्या. त्यानुसार फड यांनी स्वच्छतेसाठी प्रभाव निहाय नियोजन केले आहे. प्रभाग न्याय व्यक्तींची नियुक्ती करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच तक्रारीची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. धाराशिव शहरातील सर्व प्रभागासाठी सागर प्रधान मो.क्र. - 7349499298 तर प्रभाग क्रमांक 1 ते5 साठी दादा ओव्हाळ मो.क्र. - 9881448364, प्रभाग क्रमांक 6 ते 10 साठी दिगंबर डुकरे मो. क्र. - 8888227087, प्रभाग क्रमांक 11 ते 15 साठी गाझीमियाँ शेख मो.क्र. - 8788580500 व प्रभाग क्रमांक 16 ते 20 साठी मो.क्र. फारुख शेख मो.क्र. - 8788554475 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच या व्यतिरिक्त आपल्या प्रभागातील कचरा किंवा नाली साफसफाई केली जात नसेल तर नगरपरिषद कार्यालयातील येऊन तक्रार नोंदवही मध्ये त्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन मुख्याधिकारी वसुधा फड यांनी केले आहे.


 
Top