परंडा (प्रतिनिधी) - भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. भाजपचे परंडा तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे यांनी नियुक्त्या केल्या असून त्या पुढीलप्रमाणे - युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद (बप्पा) रगडे (वाकडी), महिला मोर्चा तालुकाध्यक्ष नुतन विलास खोसरे (सोनारी),परंडा-भुम-वाशी विधानसभा सहसंयोजक किरण शहा(परंडा), किसान मोर्चा तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे (कौडगाव), ओ.बी.सी. मोर्चा तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे (अंदोरा), अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष विश्वास लोकरे (पिंपळवाडी), अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्ष युसुफ पठाण (आरणगाव), विधी आघाडी तालुका संयोजक ॲड. रामभाऊ जामदारे (लोणारवाडी), आध्यात्मिक आघाडी तालुका संयोजक ह.भ.प. हनुमंत कोरे (तांदुळवाडी), दिव्यांग आघाडी तालुका संयोजक महादेव बारस्कर (अंदोरी), भटके विमुक्त आघाडी तालुका संयोजक लक्ष्मण जाधव (उंडेगाव), उद्योग आघाडी तालुका संयोजक राम दशरथ झोरे (वाटेफळ), मच्छीमार आघाडी तालुका संयोजक महावीर भोई (आलेश्वर), जैन प्रकोष्ट तालुका संयोजक जयघोष जैन, सोशल मीडिया विधानसभा संयोजक जयंत सायकर, सोशल मीडिया तालुका संयोजक सिध्दीक हन्नुरे (परंडा), सोशल मीडिया तालुका सहसंयोजक गौरव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या सत्कारावेळी परंडा -भुम-वाशी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, जिल्हा सरचिटणीस रामचंद्र कुलकर्णी, भाजपा नेते मुकुल देशमुख, हनुमंत पाटील, तानाजी पाटील, शिवाजी पाटील, मा. युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल पाटील, सतिश देवकर, साहेबराव पाडुळे, विलास खोसरे, सारंग घोगरे, श्रीमंत शेळके, ब्रम्हदेव उपासे , रामकृष्ण घोडके, सुरज काळे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top