धाराशिव (प्रतिनिधी)-गाव पातळीवर जनता व शासन यांच्यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या तसेच गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या पोलीस पाटलांच्या मानधनात राज्यातील शिवसेना - भाजप - राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महायुती सरकारने भरघोस वाढ केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने गुरुवार दि. 24 मार्च रोजी धाराशिव येथील प्रतिष्ठान भवन येथे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक प्रमुख नितीन काळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी फोनवरून मानधन वाढीच्या शुभेच्छाही दिल्या.

महाराष्ट्राचे महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणीस, आणि  उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचे आभार व्यक्त करण्यासाठी व पोलीस पाटलांच्या मानधनाच्या आतापर्यंतच्या लढ्यामध्ये अखंड साथ देवून हा लढा यशस्वी करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले तुळजापुरचे आमदार राणाजगजिसिंह पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक प्रमुख नितीन काळे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी पोलिस पाटील संघाच्या वतीनं आज हा कार्यक्रम आयोजित केला. युतीच्याच सरकारमध्ये आठशे रुपये असणारं मानधन तीन हजार रुपये झाले. तीन हजाराच मानधन सहा हजार पाचशे रुपये झालं.आणि सहा हजार पाचशे रुपयाचं मानधन आज पंधरा हजार रुपये केलं. यामुळं जिल्ह्यातील आणि राज्यातील पोलीस पाटील अत्यंत आनंदी आहेत. पोलीस पाटील या सन्मानाच्या पदाला तितक्याच सन्मानाच धन पाठीशी उभा करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारनं घेतला आहे त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे, महायुतीच्या सरकारचे आपण ऋणी आहोत, अशा भावना या सत्कार समारंभा प्रसंगी बोलताना पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकारी व  सर्व सदस्यांनी बोलताना व्यक्त केल्या.

यावेळी हे सर्वसामान्यचं, महायुतीचं सरकार सतत पोलीस पाटलांच्या कायम सोबत आहे असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक प्रमुख नितीन काळे यांनी उपस्थित सर्व पोलीस पाटील संघटनेच्या सदस्यांना दिले.


 
Top