धाराशिव (प्रतिनिधी)- उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिनस्त महाविद्यालयामध्ये युवकाच्या मार्फत नैसर्गिक संसाधनाचे व पाण्याची बचत  हे अभियान राबविले जात आहे. त्यानुसार 22 मार्च 2024 रोजी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव येथे जागतिक जल दिवस साजरा करण्यात आला. या अभियानांतर्गत महाविद्यालयात ग्रीन क्लब स्थापन करून विविध उपक्रम राबवण्यात आले. 

या उपक्रमाला महाविद्यालयातील विविध शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने होते. राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामध्ये पोस्टर प्रेसेंटेशन, जनजागृती पथनाट्य, भाषण स्पर्धा, बर्ड वॉटर फीडर, वॉटर ड्रिपिंग किट व जल जागरूकता कार्यक्रम असे एकूण सहा उपक्रमांचा समावेश होता. या उपक्रमातून विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण कल्पनांचे रूपांतर  अद्ययावत तंत्रज्ञान उपयोग करून प्रकल्प तयार करण्यात येणार आहे.  अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स   टेलीकम्युनिकेशन  कॉम्प्युटर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स या शाखेतील शंभर पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उच्च व तंत्र शिक्षण महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेल्फ प्लेस्ड (स्वयंगती) कोर्स पूर्ण केला अशी माहीत कार्यक्रमाचे समन्वयक व जी.सी.एफ.सी. प्रा.अभिजीत कदम यांनी दिली. महाविद्यालयात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची जबाबदारी डॉ.एस. एन. होळंबे, प्रा.व्ही.सि.मैंदर्गी, प्रा. ए. के. पिंपळे, प्रा.आर.म.शेख, प्रा. डी.डी.मुंडे व प्रा. के. जी. डोलारे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली.


 
Top