तुळजापूर (प्रतिनिधी)-एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेले 85 लाख रूपये घेवून चालक गाडीसह फरार झालयाची घटना दि. 22 मार्च रोजी दुपारी घडली. सायंकाळी ही गाडी निर्जन भागात सापडली. मात्र रोख रक्कमेसह चालक फरार आहे. याप्रकरणी चालकासह अन्य एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोधासाठी तीन पोलिस पथके रवाना झाली आहेत.

तुळजापूर येथील नळदुर्ग रोडवरील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये रक्कम भरण्यासाठी हिताची कंपनीचे कर्मचारी बोलेरो जीपने एमएच 04 जेके 4407 शुक्रवारी दुपारी 3.15 च्या सुमारास आले होते. तीन कर्मचारी कॅश भरण्यासाठी एटीएममध्ये गेले. तेव्हा बाहेर उभी असलेली गाडी हवा भरण्यासाठी चालक घेवून गेला. त्यात अजूनही रक्कम होती. बराच वेळ झाला तरी चालक न आल्याने कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर, पोलिस हवालदार रवी भागवत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. कॅश मॅनेजमेंट अधिकारी वैभव शंकर यांच्या फिर्यादीवरून जीप चालक सचिन विलास पारसे व अन्य एक तरूण (रा. दत्तनगर, तेरणा कॉलेजजवळ, धाराशिव) अशा दोघांवर तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 
Top