धाराशिव (प्रतिनिधी)- पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे 1ली ते 8वी च्या मुलांनी कलेची 7 मूलतत्वे यावर आधारित नवीन अभ्यासक्रमाद्वारे शिकवण्यात आलेल्या विविध चित्रांचे आर्ट इन फोकस प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्षा पोदार इंटरनॅशनल प्राचार्या श्रीमती रम्या तूतिका, प्रमुख पाहुणे श्री सिद्धेश्वर विद्यालय माजलगाव, जि. बीड सेवानिवृत्त कलाध्यापक उद्धव विभुते श्रीपतराव भोसले हायस्कूल धाराशिव कलाध्यापक तथा जिल्हा कलाध्यापक संघ सचिव शेषनाथ वाघ, विद्यापीठ
प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित, हर्षद जैन, चैतन्य अहेर, गणेश विभुते यांचे हस्ते करण्यात आले.
त्यानंतर 1ली ते 8वी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प , चित्रे यांचे 1ली ते 8वी इयत्ता निहाय वर्गवार स्पर्धात्मक उद्धव विभुते , शेषनाथ वाघ ,डॉ. प्रशांत दिक्षित , हर्षद जैन परिक्षक म्हणून काम पाहिले. कलाध्यापिका सुचिता रत्नपारखी, अर्चना जैन, क्रीडाशिक्षक विवेक महाजन, संगीत शिक्षक अजय उकिरडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वाती वाकेकर,व्यवस्थापकीय अधिकारी जीवन कुलकर्णी यांनी आर्ट इन फोकस प्रदर्शनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.