धाराशिव (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी आयुब शेख यांची निवड करण्यात आली आहे. आयुब शेख हे सामाजिक कार्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. नागरिकांच्या सुखा-दुखात ते नेहमी सोबत असताना आणि सातत्याने ते समाजाची सेवा करत आहे. याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सय्यद जमील यांनी संघटनेच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी अयुब शेख यांची निवड केली आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सय्यद जमील महबूब, सय्यद फैसल, लातूरचे जिल्हाध्यक्ष करीम लाला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष जफर खान, याच्यासह मोठ्या संख्येने प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


 
Top