तुळजापूर (प्रतिनिधी)- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी तुळजापूर विधानसभा मतदार संघातुन 372912मतदार 406 मतदान केंद्रावर 7 मे 2024 रोजी आला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तुळजापूर विधानसभा त तुळजापूर तालुक्यातील सर्व गावे, तांडे, वस्ती व उस्मानाबाद तालुक्यातील 72 गावांचा समावेश आहे. या मतदार संघासाठी   सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून  उपविभागीय अधिकारी  संजयकुमार ढवळे हे काम पाहणार आहेत.

241 तुळजापूर विधानसभा मतदारसंघ दि.23 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्द केलेल्या मतदार यादीनुसार नोंदणीकृत  एकूण 372913 मतदार  आहेत. त्या पैकी पुरुष 196902 तर स्ञी 175388, इतर 6 तसेच सैन्य दलातील मतदार 599 यात स्त्री 19 व पुरुष 616 आहेत. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील चालु मतदार यादीतील मतदारांचे ईपीक व फोटोचे प्रमाण शंभर टक्के आहे.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघा करीता 2108 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या मतदार संघात एकुण क्षेञाची संख्या 41 असून, संघासाठी राखीव सह 45 क्षेञिय अधिका-यांची नियुक्ती केली आहे. यात धनेगाव, शेकापूर येथील संवेदनशील मतदान केंद्र 2 आहेत. मुख्य/सहाय्यकारी/पडदानशीन/महिला/ दिव्यांग/ आदर्श/ युवा/ संवेदनशील मतदान केंद्राची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

मतदार संघाचा एकूण मतदान केंद्र संख्या 406,  पडदानशीन  मतदान केंद्र 22, महिला 1, दिव्यांग 1, आदर्श  1, युवा मतदान केंद्र 2, संवदनशिल मतदान केंद्र 2. या मतदार संघात 12 भरारी पथक, 21 स्थिर सर्वेक्षण पथक, 1 चिञकरण सर्वेक्षण पथक, 6 चिञीकरण व पडताळणी पथक असल्याची माहीती तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी दिली.


 
Top