धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील येडशी येथील मृदंगाचार्य जालिंदर (बप्पा ) सस्ते हे 1987 पासुन मृदंग कलावंत घडवण्याचे कार्य करत आहेत . शालेय शिक्षणा बरोबरच वारकरी सांप्रदाईक शिक्षण देत त्यांनी वारकरी संप्रदया चा ठेवा जतन ठेवला.हाच ठेवा त्यांचे चिरंजिव महादेव जालिंदर सस्ते गुरुजी यांनी पुढे तेवत ठेवला आसुन त्यांनी यात सुधारणा करून वारकरी शिक्षणा बरोबच संगीत , संगणक , शालेय शिक्षणास महत्व देत येडशी येथील वारकरी संप्रदयाचे वैभव म्हणून आसलेले श्रीसंत भगवानभऊ आश्रम मंदिर येथे ह्या ठीकाणी आधुनिक व मोफत हे शिक्षण देण्याचे कार्य सुरू ठेवले आहे . या आश्रमात आपल्या स्वगृही ठीकाणा वरून संस्था स्थलांतरीत करून वारकरी संप्रदयाचे महाराष्ट्राभर वैभव असलेले हे आश्रम आहे 

या वैभव शाली ठिकाणातुन गेली अनेक वर्षाच्या खंडा नंतर पुन्हा एकदा मृदंग शिक्षणाचे धडे गिरवणे सुरू झाले आहे . श्रीसंत रामकृष्ण भाऊ, श्रीसंत भगवान भाऊ  यांनी याठीकाणा वरून संपूर्ण महाराष्ट्रभर भागवत धर्माची पताका झळकवली चंद्रा - सुर्या प्रमाणे असलेल्या या दोन्ही साधुंनि याठीकाणा वरून हजारो टाळकरी,मृदंगवादक, कीर्तनकार,भजनी मंडळे बनवली व वारकरी संप्रदयाचा आचार विचार वादनकलान युक्त परंपरा उभी केली.थोडक्यात सांगायचे झाले तर वारकरी संप्रदयाचे मुल्य त्यांनी जोपासले व तसा शिष्य परिवार घडवला यामुळे हे स्थळ संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदयाचे ृद्धा - भक्तीयुक्त आहे .

परंतु याठीकाणी काहि तांत्रीक कारणाने टाळ मृदंग भजना चा आवाज खंडीत झाला होता  ते धार्मिक कार्य  पुढे आनेक वर्ष पुन्हा तेवत ठेवण्यासाठी त्यांचे पट्या शिष्य  मृदंगमहर्षि जालिंदर सखाराम सस्ते बप्पा यांचे चिरंजीव महादेव  सस्ते (गुरुजी ) हा ठेवा  पुर्ववत जतन ठेवण्यासाठी  समस्थ आश्रम संस्थान, ग्रामस्थ व भाविक यांनी त्यांच्याकडे बहाल केला आहे. आज सस्ते गुरुजी परिपुर्ण परिश्रम घेत याठीकाणी आज नित्य मृदंग,भजन, हारिपाठ आदिचे शिक्षण देऊन , विना पहार , नित्य पुजन व नेवेद्य प्रसादादिकादिचा कार्यभाग त्यांनी त्यांच्या संकल्पनेतुन सुरू केला आहे.यासाठी त्यांना मंदिर संस्थान ग्रामस्थ नागरीक व मंदिराचे भाविक भक्त हातभार लावत आहेत .या कार्यमुळे समाजातुन व वारकरी संप्रदयातुन आनंद व कौतुक केले जात आहे .


संस्थेच्या वतीने 11 विद्यार्थी वर्गास मोफत शिक्षण 

आज हे स्थळ श्रीसंत .रामकृष्णभऊ,भगवान भऊ,परमेश्वर महाराज मंदिर संस्थान व मृदंगाचार्य जालिंदर ( बप्पा ) सस्ते वारकरी सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने 11 विद्यार्थी वर्गास प्रवेश देऊन त्यांना मृदंग ,भजन , हारिपाठ , दिंडी पावले ,वारकरी संप्रदयाचे धडे देऊन कलात्मक व संस्कारीत व स्वावलंबी युवक घडवण्याचे कार्य हाती घेतले आहे.विशेष म्हणजे त्यांच्या कडुन कोणत्याही प्रकारे फीस आकारली जात नाही.त्यांना जेवणाची व्यवस्था जागेवरच संस्थेच्या वतीणे करण्यात आली आहे .या शिक्षणासाठी एखाद्या विद्यार्थीवर्गास संस्थेत प्रवेश घ्यावायाचा आसल्यास  त्यांना संपूर्ण में महिन्यात ट्रेनिंग देण्यात येते यात पात्र ठरलेल्या विद्यार्थीना प्रवेश देण्यात येतो संस्थेच्या व्यवस्थापन प्रक्रिये नंतर प्रवेश भरती पुर्ण झाल्यास एखाद्या विद्यार्थीना प्रवेश घ्यावा आसे वाटल्यास त्यांना मात्र डोनेशन स्वरूपात फीस आकारून प्रवेश देण्यात येतो .आसे संस्थानचे धार्मिक कार्यक्रम व्यवस्थापक सर्वश्री महादेव सस्ते ( गुरुजी ) येडशीकर यांनी केले.


 
Top