भूम (प्रतिनिधी)-केंद्रीय प्राथमिक शाळा आष्टा येथे स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ व स्वयंशासन दिनाचे निमित्ताने आयोजित कार्यक्रमात दत्तात्रय गुंजाळ बोलत होते. 

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय गुंजाळ तर अध्यक्ष अक्षरा बनसोडे या होत्या.विद्यार्थी हा भावी राष्ट्रनिर्माता व नागरिक आहे.त्याच्या ठायी विविध सद्गुणांची मांदियाळी करायची असेल तर योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नाही तर त्यांच्यातील आत्मविश्वास व सुप्त गुणांना वाव मिळण्यास प्रोत्साहन देणे म्हणजे शिक्षण होय. विद्यार्थ्यांनी केवळ शालेय अभ्यासक्रमावर लक्ष न देता विवीध कलाकौशल्य वाढवण्यावर भर द्यावा असे प्रतिपादन गुंजाळ सरांनी केले.विद्यार्थ्यांनी प्रसंगोपात भाषणे केली. अध्यापन करताना आलेले अनुभव, शाळेच्या आठवणी आदीबाबत विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.वर्गातर्फे शाळेस सुंदर प्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक पाटील, मुख्याध्यापक  संजिवन तांबे, ज्ञानदेव कातुरे, अशोक नलवडे, विठ्ठल सारुक, विजयालक्ष्मी उपळकर,अनिता नाईकवाडी व पुतळा पवार आदी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया बनसोडे हिने केले.


 
Top