तुळजापूर (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विधमाने तुळजापूर  न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. होते. यातप्रलंबित दिवाणी व फौजदारी स्वरुपाच्या 65 प्रकरणांमध्ये तसेच वाद पुर्व प्रकरणांमध्ये 236 अशी एकुण 301 प्रकरणामध्ये तडजोड झाली. धनादेश अनादर प्रकरणी फिर्यादी पक्षाला रुपये 15,63,298/- वसूली झाली. दावा पुर्व प्रकरणांमध्ये रूपये 13, 67, 503 /- रक्कमेची संबंधीत नगरपरिषद, बँक, ग्रामपंचायतीला वसूली झाली. त्याचबरोबर किरकोळ फौजदारी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये आरोपींना दंडात्मक शिक्षा होवून रक्कम रु. 13800/- इतका दंड करणेत आला. प्रलंबित बँकेच्या दिवाणी दाव्यातील रक्कम रु. 22,37,470/- तडजोडीअंती वादी यांना मिळाली.

श्रीमती ए. एस. शेंडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धाराशिव यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने लोकअदालतीचे व रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. डी. एन. भरगंडे उपस्थित होते. यावेळी  श्री. एम. एम. निकम, दिवाणी न्यायाधीश क. स्तर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तुळजापूर, श्रीमती पी. एस. जी. चाळकर, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर तुळजापूर, श्री. के. एस. कुलकर्णी, 2 रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर तुळजापूर, ॲड. श्री. बी. सी. देशमाने, नवनिर्वाचित अध्यक्ष विधीज्ञ मंडळ, तुळजापूर व सर्व नवनिर्वाचित सदस्य, विधिज्ञ मंडळ, तुळजापूर श्री. एन. व्ही. देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर, श्री. आर. पी. खांडेकर पोलीस निरीक्षक तुळजापूर, श्री. शैलेश पवार सहा. पोलीस निरीक्षक तामलवाडी, श्री. देवकर साहेब सहा. छोलीस निरीक्षक नळदुर्ग, सरकारी वकील श्री. अमोघसिध्द कोरे  उपस्थितीत होते.


लोकअदालत मध्ये रक्तदान शिबीर 

सदर लोकअदालतीचे घेण्यात आलेल्या रक्तदाध शिबीरात   एकुण 45 व्यक्तींनी आपले रक्तदान केले.  तुळजापूर न्यायालयातील सर्व न्यायीक वर्ग, न्यायालयीन कर्मचारी, तुळजापूर विधीज्ञ संघाचे सर्व सदस्य, तुळजापूर पोलीस ठाणेकडील न्यायालयात नेमणूक असलेले पोलीस कर्मचारी यांनी सदर

लोकअदालत यशस्वी होणेसाठी परिश्रम घेतले.


 
Top