कळंब (प्रतिनिधी)-धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी पारदर्शक पध्दतीने उपलब्ध करुन देण्याकरिता गठीत जिल्हास्तरीय समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून विजयकुमार सांगळे यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, 1950 च्या कलम 41 अअ मधील तरतुदी व त्यानुषंगाने मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका (पीआयएल) क्रमांक 3132/2004 मध्ये दिलेल्या न्यायनिर्णयानुसार निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळण्याकरीता योजना तयार केलेली आहे. त्यानुसार प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयातील एकूण कार्यान्चीत खाटांपैकी 10 टक्के खाटा निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व 10 टक्के खाटा दुर्बल घटकांतील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे या रुग्णालयांना बंधनकारक आहे. मात्र असे होत नसल्यामुळे विधी व न्याय विभागाने जिल्हास्तरीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे. विधी व न्याय विभागा दिनांक 14 मार्च रोजी  शासन निर्णय काढाल आहे. सदस्य म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील व आमदार ज्ञानराज चौगुले असणार आहेत. तर सामाजिक क्षेत्रातुन नामनिर्देशित सदस्य म्हणून विजयकुमार सांगळे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.


 
Top