धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित  फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल धाराशिव (सीबीएसई बोर्ड ) यांच्या वतीने विद्यालयीन शैक्षणिक वर्षात अनेक सामाजिक, सांस्कृतिक, विविध संकल्पनात्मक, कला - संगीत - नृत्य तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनवण्याचा प्रयत्न केला जातो. याचप्रमाणे ई. एच. एफ. इंटरॅक्टिव्ह ऑलिम्पियाड एक्झाम 2023 मध्ये. फ्लाईंग किड्स मधून एकूण 119 विद्यार्थ्यी सहभागी झाले होते. त्यातून 114 विद्यार्थ्यी पुढील नेक्स्ट लेवल एक्झामसाठी पात्र ठरले आहेत. तसेच शालेय स्तरावरील ई. एच. एफ. इंटरॅक्टिव्ह ऑलिम्पियाड 2023 मध्ये 08 विद्यार्थी गोल्ड मिडल मेडल , 11 विद्यार्थी सिल्व्हर मेडल तर 3 विद्यार्थी ब्राँझ मेडल मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.

शालेय स्तरावर असंख्य उपक्रम राबवत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया पक्का करावा. तसेच आपले विद्यार्थी समाजात वावरताना कुठेच व्यावहारिक पातळीवर कमी पडता कामा नये, आपला विद्यार्थी उत्तरोत्तर प्रगती करत रहावा या उदात्त हेतूने शाळेकडून शैक्षणिक बाबींसह इतर असंख्य उपक्रम सुद्धा राबवलेले जातात. सदरील एच. एफ. इंटरॅक्टिव्ह ऑलिम्पियाड एक्झाम 2023 मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व पातळीवरून कौतुक होत आहे. आ. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्री सुधीर अण्णा पाटील व सरचिटणीस सौ. प्रेमा ताई पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य भैय्या पाटील, विद्यालयाचे संचालिका डॉ. मंजुळा आदित्य पाटील व विद्यालयाचे प्राचार्य चतुर्वेदी व सर्व शिक्षक, शिक्षिका वर्ग तसेच समस्त पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत, प्रमाणपत्र व प्राप्त मेडल देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.


 
Top