सोलापूर (प्रतिनिधी)-मध्य रेल्वे सोलापुर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक श्री.एल. के. रणयेवले आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्रीमती कल्पना बनसोडे यांच्या देखरेखी खाली खऱ्या अर्थाने आरामदायी आणि सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलापूर विभागातील गाड्यामध्ये तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे.

मध्य रेल्वे च्या सोलापूर विभागाने फेब्रुवारी महिन्यात आपल्या कडून तिकीट तपासणी मोहीम यशस्वी केली आहे. त्या संदर्भातली आकडेवारी खालीलप्रमाणे फेब्रुवारी 2024 मध्ये 1192 इतक्या तिकीट तपासण्या घेण्यात आल्या. 

या घेण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये 40,236 इतक्या विनातिकीट प्रवाश्यांच्या केसेसच्या नोंदी करण्यात आल्या. त्यामध्ये 2,62,17,555/- रुपयांचा दंड वसूल केला आहे. यावेळी रेल्वे प्रवाशांना वैध प्रवास तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले.  शेवटच्या क्षणी आरक्षण सुविधा देण्यासाठी, चार्ट तयार झाल्यानंतर आणि ट्रेनच्या नियोजित प्रस्थानाच्या 30 मिनिटे आधी प्रवासी चालु आरक्षण सुविधेचा लाभ घेऊ शकतात. रांगेत उभे राहू नये म्हणून प्रवाशांना निवडक स्थानकांवर  (स्वयंचलित तिकीट वेंडिंग मशिन्स) वरून तात्काळ अनारक्षित तिकिटांची सुविधा मिळू शकते.

त्रास मुक्त सेवा आणि सुविधा देण्यासाठी रेल्वेने सतत प्रयत्नशील असताना  मोबाइल अँप उपलब्ध करून दिले आहे. ज्यामध्ये प्रवासी पेपरलेस प्रवासाची तिकिटे, सीझन तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट  मोबाइल अँप्लिकेशन द्वारे बुक करू शकतात आणि तिकीट मोबाइल ॲप्लिकेशनमध्येच वितरित केले जाईल जे की  आणि  प्लॅटफॉर्म वर लब्ध आहे. तिकिटाची हार्ड कॉपी न घेता प्रवासी प्रवास करू शकतात. जेव्हा जेव्हा तिकीट तपासणारा कर्मचारी तिकीट मागितले तेव्हा प्रवाशांनी अँप मधील  'शो तिकीट' पर्याय वापरावा. सर्व प्रवासी नागरिकांना नम्र विनंती आहे कि त्यांनी रेल्वे प्रवास करताना, उचित तिकीट घेऊनच रेल्वे प्रवास करावा.


 
Top