परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील अनाळा येथील रॉयल पब्लिक स्कूल या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन  उत्साहात संपन्न झाले .स्नेह संमेलनाचे उद्घाटन माजी आमदार तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिह ठाकूर व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत हस्ते जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले. या वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाच्या माध्यमातून पारंपारिक लोककलेसह देशभक्तीपर गीते , लावण्या, हिदी गीते, मराठी गीते, विविध कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष सुभाष मोरे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा आशाताई मोरजकर, आंबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गोरक्षनाथ खरड, आनाळा च्या सरपंच अंबिका ज्योतीराम क्षिरसागर, ज्योतीताई धनंजय सावंत, पवार उदयोग समुहाचे संचालक रामचंद्र पवार, ॲड. अजय खरसडे, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष गोरख मोरजकर, आनाळा ग्रा.प. चे उपसरपंच दादासाहेब फराटे, कल्पनाताई मोरे, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष निशिकांत क्षिरसागर व संस्थेच्या सचिव प्रियंका निशिकांत क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रगतीशील शेतकरी बिभिषण आप्पा शिंदे, जोतीराम आबा क्षिरसागर, ग्रा.प. सदस्य अशोक शिंदे, अजित शिंदे, चांगदेव चव्हाण, विनोद कदम, भाऊसाहेब क्षिरसागर, हनुमंत क्षिरसागर, अंबादास क्षिरसागर, जि प शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत साळुंखे, पो.कॉ. कुंभार, हे.कॉ खैरे, उदयोजक मारूती शेळवणे, जयसिंग चौघुले,यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत जगताप, प्रिया देशमुख, उषा क्षिरसागर, कविता जगताप, कु. नम्रता क्षिरसागर, कु.श्वेता गायकवाड,कु. काजल आवाळे, आंबादास गायकवाड, विकास हगारे, कैलास थोरात, आजिनाथ मोरे, बालाजी गरड,विकास हगारे , बाबासाहेब गायकवाड, आदीनी परिश्रम घेतले, कार्यक्रमासाठी मोठया प्रमाणात ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थित होते.


 
Top