सोलापूर (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या वरिष्ठ वाणिज्य विभागीय व्यवस्थापक म्हणून योगेश पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. 

ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2015 च्या परीक्षा बॅचचे इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस (आयआरटीसी) अधिकारी आहेत. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या वरिष्ठ वाणिज्य विभागीय व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सहाय्यक परिचालन व्यवस्थापक आणि मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात, विभागीय परिचालन व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. योगेश पाटील यांनी सोलापूर विभागाचे मावळते वरिष्ठ वाणिज्य विभागीय  व्यवस्थापक एल. के. रणयेवले यांचा ते प्रशासकीय पदभार स्वीकारला आहे.


योगेश पाटील यांनी पदवीचे शिक्षण कवियत्री बहिणाबाई चौधरी, उत्तर  महाराष्ट्र  विद्यापीठातुन  आणि  पदव्युत्तर  शिक्षण हे  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून संगणकीय शास्त्र या शाखेतून पूर्ण केले.  योगेश पाटील यांना 2021-22 यावर्षी  मध्य रेल्वेच्या  महाप्रबंधक पुरस्काराने सम्मानित केले. योगेश  पाटील यांनी आपली सात वर्ष अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. येणाऱ्या काळात याच दीर्घ अनुभवाचा सोलापूर विभागाला नक्कीच फायदा होईल.


 
Top