भूम (प्रतिनिधी)- येथील नादब्रह्म संगीत विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे . या परीक्षेमध्ये या विद्यालयाचे एकूण पाच विद्यार्थी विशारद प्रथम व पूर्ण या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. भूम तालुक्याच्या संगीत परीक्षेच्या इतिहासामध्ये नादब्रह्मणे प्रथमच असे यश मिळवत इतिहास घडवला आहे. 

विशारद परीक्षेमध्ये गायन परीक्षेत दोन तर तबला परीक्षेत तीन विद्यार्थ्यांनी यश मिळविले. नोव्हेंबर डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या या परीक्षेमध्ये नादब्रह्मच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. ही परीक्षा एकूण 68 विद्यार्थ्यांनी दिली होती.  नादब्रम्ह संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ अंतर्गत ही परीक्षा नोव्हेंबर डिसेंबर 2023 मध्ये दिली होती. विशारद परीक्षेमध्ये यश मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वप्निल गांधले व ऋतुजा पाटोळे (गायन), ऋत्विक पाटोळे, श्रेयश भोरे व रोहित कांबिलकर (तबला) यांचा समावेश आहे. या यशस्वी व इतर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा नादब्रह्म विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नादब्रह्म विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप गवळी, उपप्राचार्य योगेश वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले.
 
Top