कळंब (प्रतिनिधी)-सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या बोरच्या वीज बिल अवाच्या सव्वा अकारणी  संदर्भात नागरिकांनी कोर्टात न्याय मागणी करताच न्यायालयाने मनाई आदेश दिला पण न्यायालयाचा आदेशही महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी झुगारून कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली एक नाही तर दोन वेळा दाखवून वीज पुरवठा अखेर सुरळीत केलाच नाही.  अशा कामचुकार व मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून पुन्हा न्यायालयात केली आहे.  न्यायालय या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

याबाबत अधिक वृत्त असे की कळंब शहरातील प्रतिष्ठित समजली जाणारी साईनगर हाऊसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी चा सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या बोरचा महावितरणाने वीज पुरवठा खंडित केला आहे.  हे विज बिल अव्वाच्या सव्वा  आकारणी केली या बिलासाठी साई नगरीने कोर्टात धाव घेऊन ऑक्टोबर 22 मध्ये दावा दाखल केला होता. या दाव्यात न्यायालयाने 21 ऑक्टोबर 22 रोजी दाव्याचा निकाल लागेपर्यंत साईनगरचा वीजपुरवठा खंडित करू नये असे मनाई हुकूमचा आदेश महावितरणाला दिला होता. यावर साईनगर मार्फत महावितरणाला अनेक वेळा पत्र व्यवहार करूनही पूर्वीप्रमाणे विज बिल आकारणी करून द्या आम्ही बिल भरण्यास तयार आहोत. पण महावितरणाने पत्राची दखल न घेता आपला मनमानी कारभार करून शेवटी अधिकाऱ्यांनी 19  मार्च रोजी साईनगरचा वीजपुरवठा खंडित केला. कोर्टाच्या आदेशाचा अवमान केला व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा यासाठी साईनगरने पुन्हा  कोर्टात धाव घेतली. यावर न्यायालयाने दोन्ही बाजूचा ऐकून वीज पुरवठा सुरळीत करावा असे आदेश न्यायालयाने 22 मार्च रोजी दिले. परंतु हा या देशाची महावितरणाने पायमल्ली करत अजूनही म्हणजे 26 मार्च संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही विज जोडणी केलीच नाही.  त्यामुळे संबंधित साईनगर भागातून या अधिकाऱ्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


 
Top