भूम (प्रतिनिधी)- भेसळ क्रियेतून तयार होणारे दूध हे दिसायला जरी साध्या दुधासारखे असले, तरी चवीला मात्र शंकास्पद वाटते आणि अशा दुधामध्ये पौष्टिक गुणधर्म काहीही नसतात. अशा दुधाचा आरोग्यावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन भेसळ दुधाबाबत  नागरिकांनी जागरूक झाले पाहिजे ही काळाची गरज आहे. त्याचं कारण असं की काही दिवसापूर्वी धाराशिव अन्न भेसळ अधिकारी यांच्याकडे शिवसेनेच्या विकास बाबर यांनी संदर्भात तक्रार दाखल केली असताना अन्नसुरक्षा अधिकारी यांनी आणि हल्याला इंजेक्शन प्रमाणे तक्रारीवर दुधाची तपासणी होणे गरजेचे आहे. त्यांनी दुधात मिसळली जाणाऱ्या दूध पावडर विक्री करणाऱ्यांची पावडर ही बेकरी प्रॉडक्ट मध्ये वापरण्यात येत असल्याचे सांगून त्याची तपासणी आमच्या मार्फत करण्यात येणार असल्याचे सांगितल्याने विविध विषयाला उधाण आले. भूम तालुका महाराष्ट्रात दूध उत्पादनास प्रामुख्याने तालुका मानला जात आहे. याच तालुक्यात जर भेसळ होत असेल या भेसळला जर संबंधित अधिकारी पाठबळ देत असताना तर आगामी काळात भूम तालुक्यातून जाणारे दूध ज्या ज्या शहरात जातील त्या त्या शहरातील नागरिक व मुलांची आरोग्य कितपत निरोगी राहील याबाबत शासक्ता आहे.


दुधाचे शरीरासाठी फायदे

दूध हे शरीरातील ऊर्जेची झीज भरून काढणारी प्रथिने, हाडांच्या वाढीस आवश्यक असणारी मूलद्रव्ये आणि निरोगी आरोग्य देणारी जीवनसत्त्वे, तसेच शरीरास आवश्यक असणारी ऊर्जा पुरविणारे स्निग्धांश आणि दूध शर्करा यांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करते. हे घटक पचनास सुलभ आणि पूर्णपणे पचन होणारे असतात. 


दुधामध्ये भेसळीच खाद्यतेल, सोडा, युरिया आणि पाणी खाद्योपयोगी तेल, स्निग्धांशविरहित दूध, युरिया, सोडा, मीठ, निरमा पावडर, साखर आणि पाणी.

खाद्योपयोगी तेल, स्निग्धांशविरहित दूध, युरिया, साबण चुरा आणि पाणी अशा प्रकारच्या तयार होणाऱ्या दुधामध्ये तेल हे स्निग्धांशाचा स्रोत म्हणून वापरण्यात येते आणि इतर घटक पदार्थ हे स्निग्धांशविरहित दुधाचा स्रोत म्हणून वापरले जाते. अशा प्रकारचे दूध हे गावपातळीवरील दूध संकलन केंद्रातील चाचण्यांमध्ये पास होते ? कारण या ठिकाणी फक्त स्निग्धांश आणि स्निग्धांशविरहित घटकच पाहिले जातात, पण अशा प्रकारचे दूध हे शरीरास खूप हानिकारक आहे. संयोग क्रियेतून तयार होणारे दूध आणि नैसर्गिक दूध यांमधील फरक पहिला तर संयोग क्रियेतून तयार होणाऱ्या दुधाचा रंग जरी नैसर्गिक दुधासारखा दिसत असला, तरी ते दूध चवीला कडवट व त्याचा गंध, वास साबणाच्या पाण्यासारखा येतो. अशा दुधाची सर्वसाधारण तापमानाला साठवणूक केली तर ते दूध फाटते, नासते व त्याला पिवळसर रंग प्राप्त होत नाही. संयोग क्रियेतून तयार होणारे दूध खरबरीत पात्रावर घासले असता फेसाळते, फेस तयार होतो आणि उष्णता दिल्यास पिवळसर रंगछटा प्राप्त होते. त्याचा गंध/वास काहीसा साबणाच्या पाण्यासारखा येतो. भेसळ चाचणी केली तर त्या सर्व चाचण्यांमध्ये भेसळ झालेली दिसून येते ? दूधाचे माप वाढविल्यामुळे त्यातील एस.एन.एफ. (घनपदार्थ विरहित स्निग्ध) कमी होते. हे टाळण्यासाठी त्यामध्ये लॅक्टोज, साखर, ग्लुकोज तसेच पीठ व मैदा अशा प्रकारचे स्टार्च; मीठ, युरिया, स्कीम मिल्क (दुधाची) पावडरची भेसळ करण्यात येत असावी. ग्रामीण भागात शक्यतो प्रत्येक दिवशी एकाच वेळेला दूध संकलन केंद्रावर दूध संकलित केले जाते. अशा ठिकाणी दूध टिकून राहण्यासाठी त्यात खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, कपड्यांची पावडर, युरिया इत्यादींसारखे पदार्थ मिसळतात.


भेसळ दूधापासून होणाऱ्या दुधाच्या सेवनामुळे होणारे अपाय

भारतीय औषध प्रमाणित संस्थेनुसार अशा भेसळयुक्त पदार्थांमुळे मानवास कॅन्सरसारखे रोग होऊ शकतात.

युरियाच्या अतिवापरामुळे, सेवनामुळे मूत्रविकारही जडू शकतात. त्याचप्रमाणे हृदयास व फुफ्फुसासही हानिकारक ठरू शकते.

सोड्याच्या अतिसेवनामुळे लहान मुलांमध्ये वाढीस असणारे प्रथिनांचे (लायसीन) प्रमाण कमी होते, यामुळे शरीरवाढीवर विपरीत परिणाम होतात.दुधात होणारी भेसळ ही अतिशय गंभीर बाब आहे. भेसळ करणारे दूध टिकून राहण्यासाठी त्यात खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, कपड्यांची पावडर, युरिया इ. पदार्थ मिसळतात. या भेसळीमुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतात. 


भेसळयुक्त दुधाचे दुष्परिणाम

भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यास अपायकारक असते, त्यापासून असाध्य आजार उद्भवण्याची शक्यता असते जसे की - आय.सी.एम.आर.च्या अहवालानुसार भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्यास क्षयरोग होऊ शकतो. युरियाची भेसळ केल्याने त्यातील नायट्रोजन या घटकामुळे मूत्रपिंड, हृदय व यकृत यांसारखे अवयव निकामी होण्याची भीती असते, तसेच कॉस्टिक सोड्याच्या भेसळीमुळे दुधातील शरीरवाढीसाठी आवश्यक असणारे लायसिन हे अमिनो आम्ल शरीरास उपलब्ध होत नाही. परिणामी लहान मुलांच्या शरीरवाढीवर परिणाम होऊन शरीराची वाढ खुंटते. यामधील सोडिअमसारख्या घटकाचा मानवी शरीरावर परिणाम होऊन उच्च रक्तदाब व हृदय विकारासारखे आजार जडतात.


भेसळ करणाऱ्यांना फाशी द्या : अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार असताना त्यांनी दूध भेसळीच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले. राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. दूध भेसळीचे मोठे साम्राज्य पसरले आहे. लहानग्या कच्च्याबच्च्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. दूध भेसळ करून सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद कायद्यात करावी.


एकंदरीत मंत्रालयामध्ये सुद्धा दूध भेसळ विषयी कठोर पावले उचलण्याचे मंत्रिमंडळात बोलले जात असताना मात्र सध्या राजरोसपणे एका दूध पावडर पिशवीतून जवळपास 100 लिटर दूध बोगस तयार केले जातात हे वास्तविकता आहे. मात्र याबाबत संबंधित अधिकारी मूग गिळून गप्प आहे असे सर्वसामान्य नागरिकांतून चर्चिले जात आहे.


 
Top