भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील पाथरूड येथील ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या वैजिनाथ देवस्थान  येथे  राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर प्राध्यापक तानाजी सावंत यांच्या माध्यमातून स्वखर्चातून नव्यानेच बांधकाम करण्यात आलेल्या वॉल कंपाऊंड चे  11 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

पाथरूड येथील श्री क्षेत्र वैजिनाथ देवस्थान हे डोंगराच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात बसलेल्या एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. 17 ऑगस्ट 2023 रोजी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे पाथरूड भागात दौऱ्यानिमित्त आले होते. त्यासोबतच विविध विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पाथरूड येथे करण्यात आले. यावेळी त्यांनी श्रीक्षेत्र वैजनाथ देवस्थान येथे भेट देऊन दर्शन घेतले होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी येथील देवस्थानला वॉल कंपाऊंडची गरज आहे. परंतु शासकीय फंडातून त्या ठिकाणी निधी मिळवण्यास अडचण निर्माण होते. ही बाब आरोग्यमंत्री सावंत यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर लगेच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी लगेच हे काम मी स्वखर्चातून करून देतो असे आश्वासन देऊन दीपावलीच्या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या कामास प्रारंभ देखील करण्यात आला. हे काम पूर्ण झाल्याने 11 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते या ऑल कंपाऊंड कामाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बप्पा जाधव, दत्ता साळुंखे, दत्ता मोहिते, वैजिनाथ म्हमाने, रामकिसन गव्हाणे, दत्तात्रय गायकवाड, रवींद्र नागरगोजे, गौतम लटके, सुग्रीव मुरूमकर, नितीन महानवर, बापूराव खामकर, निलेश चव्हाण, या सोबतच पाथरूड परिसरातील विविध गावातील सरपंच, उपसरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top