धाराशिव (प्रतिनिधी)-तुळजापूर तालुक्यातील तिर्थ (बु) येथे दि. 10 फेब्रुवारी 2024 रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.
शनिवार दि. 10 फेब्रुवारी रोजी तुळजापू तालुक्यातील तिर्थ (बु) येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 415 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 100 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे मनोज माडजे, महादेव मोरे, बाळासाहेब जाधव, महादेव उमाटे, ऋषीकेष निचळ, विनोद मोरे, काळराज वाघमारे, वसंत सगट, सचिन देसाई, जि.प शाळेच्या मुख्याध्यापक शिंदे मॅडम व सर्व कर्मचारी वर्ग इत्यादी ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. अभिजीत यादव, डॉ. कपील डोंगरे, डॉ. पंकज बागुल, डॉ. प्रज्वल उकळीकर, डॉ. सचिन शिंदे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, संदिप खोचरे यांनी परिश्रम घेतले.
%20%E0%A4%A4%E0%A4%BE.%20%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%20%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87%20%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF.jpeg)