तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी  मंदिरामधील सिंहासन पेटी घोटाळा, दागदागिने  तपासणी प्रकरण, देवी दर्शन देताना भाविकांना केला जाणारा भेदभाव यासह अनेक प्रकरणां बाबतीत योग्य वेळी योग्य ती कठोर कारवाई न केली गेल्यामुळे व या प्रकरणांचा निकाल न लागल्यामुळे लाचेचा प्रकार श्रीतुळजाभवानी मंदिरात घुसला गेला असावा. माञ या प्रकरणामुळे  श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या कारभाराची मोठी बदनामी होत असून, श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचा कारभार पारदर्शक कधी होणार असा सवाल भाविकांमधुन केला जात आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थानचा वित्त व लेखाधिकारी सिध्देश्वर शिंदे यांना 6 लाख रूपयाच्या लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या लाच प्रकरणाने श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने केले जाणारे विविध विकास कामे संशयाचा भोव-यात सापडले आहेत. मागील पंधरा वर्षापासुन कोट्यावधी रुपयाचे जे बिले काढले गेले त्याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने केलेल्या विकास कामांची काही बिले अचानकपणे मोठ्या रकमेचे एकदम काढले गेले आहेत. याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. श्री तुळजाभवानी मंदिरातील या लाच प्रकरणा मागे कोण आहे का याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.


 
Top