भूम (प्रतिनिधी)-महाबोधी बहुउद्देशीय सामाजिक संस्था वाटपळ अमरावती  यांच्या वतीने बौद्ध धम्माची चळवळ गतिमान करण्यासाठी कार्य करणारे  पंचायत समिती भूम येथील विस्तार अधिकारी वसंत वाघमारे यांना  'धम्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 32 व्या बौद्ध धम्म परिषदेत जागतिक कीर्तीचे कपिलवस्तू येथील धम्मप्रिय महाथेरो (कपिलवस्तू), प्रा. सुमेधबोधी यांच्या हस्ते वाघमारे यांनी हा सन्मान स्वीकारला. 

सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमवटणारे फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा प्रचार आणि प्रसार आपल्या ओघवत्या वानितून करणारे वसंत वाघमारे यांनी विविध क्षेत्रातील सखोल अभ्यास, उत्कृष्ट वक्ता व माणसं जोडण्याची कला अवगत केली आहे. यांचे विविध सामाजिक सांस्कृतीक क्षेत्राशी जवळचे संबंध आहेत. बौद्ध धम्म परिषदच्या माध्यमातून त्यांनी व त्यांच्या टिमने कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये भूम शहर व परिसरातील गरीब व हातावर पोट असलेल्या कुटुंबीयांना जिवनावश्यक वस्तुचे वाटप करून मोठा दिलासा दिला. त्याचबरोबर भूम येथे राज्यस्तरीय पहिली बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी नागघोष, धम्मदीप, डॉ. हर्षदीप व भिक्कू संघ उपस्थित होता. वाघमारे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शहरवासीयाकडुन अभिनंदन होत आहे.


 
Top