तुळजापूर (प्रतिनिधी)- यंदा तुळजापूर तालुक्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने जानेवारी अखेर पासुन तालुक्यात पाणीटंचाई च्या तीव्र झळा सुरु झाल्या आहेत.प्रथमच जानेवारी महिन्यात 15गावात पिण्याच्या पाण्यासाठी 33 विंधनविहरी अधिग्रहण केले गेल्या आहे.
फेब्रुवारी पासुन यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या पाणीटंचाई नियोजनसाठी 18लाख रुपये निधीची मागणी केली असुन यात पुढे आणखी वाढ होणार आहे. यंदाचा उन्हाळा निवडणुक कालावधीत येण्याची शक्यता असल्याने प्रशासन अधिक गतिमान राहणार असुन सत्ताधारी दुष्काळाच्या झळा ग्रामस्थांना म्हणजे मतदारांना बसु नये याची पुरेपुर काळजी घेण्याची शक्यता आहे. चालू वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तुळजापूर सध्या स्थितीत तालुक्यातील खरीपांची पिके पाण्याअभावी माना टाकत आहेत. तलावासह विहीरींनी तळ गाठला आहे. तर विंधनविहीरी शेवटच्या घटका मोजत आहेत. भर हिवाळयातच पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.पोटच्या पोरा प्रमाणे जपलेले पशुधन जगविण्यासाठी सध्या बळीराजाला कसरत करावी लागत आहे.
जानेवारी अखेरपर्यंत तालुक्यातील
15 गावातून 33 विधनविहीरी अधिग्रहन केले आहेत यापैकी काञी 1 बसवंतवाडी 2देवसिंगा तुळ 1क्राकंबा 6 बोरनदवाडी 1 किलज 6 सरडेवाडी 1कुंभारी 2बारुळ 2ढेकरी 1 गोंधळवाडी 1शिराढोण 1वडगाव लाख 2गंधोरा 3जवळगा मेसाई 1
बोर अधिग्रहण अधिकार तहसिलदारांन कडे !
बोर अधिग्रहण अधिकार या पुर्वी उपविभागीय अधिकारी एसडीओ ना होते ते आता तहसिलदार यांच्या कडे आले आहेत.
प्रस्ताव येताच तात्काळ मंजुरी साठी सादर - गटविकासअधिकारी ताकभाते
तुळजापूर तालुक्यात पाणीटंचाई बाबतीत प्रस्ताव येताच ते तात्काळ आम्ही मंजुरी साठी सादर करीत असुन तालुका वासियांना दुष्काळाचा झळा सोसाव्या लागु नये यासाठी आम्ही सज्ज असल्याची माहीती गटविकासअधिकारी अमोल ताकभाते यांनी दिली.