धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. आंबेडकर कारखाना राजे बोरगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी तानाजी उर्फ बाळू शिवाप्पा नांदे यांचा काल विजेच्या ताराचे घर्षण होऊन ठिणगी पडून काल दुपारी चारच्या दरम्यान उसाने पेठ घेतला. त्यावेळी परिसरातील शेतकऱ्याला कळताक्षणी तातडीने सर्वांनी मिळून आग विझवण्याचा प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. संबंधित बातमी गावातील वार्ताहार प्रशांत गुंडाळे मार्फत कारखान्याचे संचालक ॲड. निलेश बारखडे पाटील यांना कळल्यानंतर तातडीने दखल घेऊन शेतकी मदतनीस माने यांना कळवून त्यांना त्या ठिकाणी पाठवून आज रोजी सकाळी संबंधित शेतकऱ्याला त्यांच्या उसाची ऊसतोड चालू करण्यात आली.
ऊसतोड चालू झाल्यामुळे संबंधित शेतकरी व ऊस उत्पादक यांनी कारखान्याचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने तातडीने दखल घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्याला दिलासा दिल्यामुळे सभासदाचा असणारा विश्वास या कारखान्याने सार्थ ठरवला अशी भावना या ठिकाणी व्यक्त झाली.