तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव लोकसभा मतदार संघातुन महाविकास आघाडीचे सक्षम उमेदवार खासदार ओमराज निंबाळकर यांना लढत देण्यासाठी भाजपकडुन सध्या स्वच्छ प्रतिमेचे आयएएस अधिकारी प्रविणसिंह परदेशी यांच्या नावाची चर्चा राजकिय वर्तुळात चर्चिली जात आहे. याला भाजपचा ही पाठींबा असल्याची  चर्चा असुन, महायुतीतुन भाजपकडुन आयएएस अधिकारी प्रविणसिंह परदेशी यांचे संभाव्य उमेदवार म्हणून नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

सध्या धाराशिव लोकसभेसाठी महायुतीत शिवसेनेकडुन धनंजय सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडुन बिराजदार यांचे नावे चर्चत आहेत. तर महाविकास आघाडीकडुन विधमान खासदार ओमराजे निंबाळकर नांव निश्चित समजले जात आहे. माञ भाजपकडुन अचानक आयएएस अधिकारी प्रविणसिंह परदेशी या निष्कलंक निस्पृही प्रशासनातील दिग्गज मानल्या जाणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव पुढे आल्या ने महायुतीचा उमेदवार कुण्या पक्षाचा व कोन असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

  आयएएस अधिकारी प्रविणसिंह  परदेशी यांची कर्मभूमी  धाराशिव  लातुर व जन्मभूमी  सोलापूर आहे. तिन्ही जिल्हयात हे  परिचित आहे. त्यातच भाजपने अनेक सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्यांना संधी दिली असुन, त्याचे त्यांनी कामाचा माध्यमातून सोने केले आहे. याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी धाराशिव लोकसभा मतदार संघातुन आयऐएस अधिकारी प्रविणसिंह परदेशी ना संधी देणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. प्रविणसिंह  परदेशी सध्या मिञा या महाराष्ट्र निती आयोगाचे सी ओ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी चेअरमन असलेल्या मिशन कर्मयोगी संस्थेत एमडी म्हणून काम करीत आहेत. या दोन व  युटीएसऐफ या  संस्थांच्या माध्यमातून त्यांनी जिल्हयात जवळपास एक लाख महिला व कर्मचारीशी प्रत्यक्ष संवाद साधला आहे.

निष्कलंक विकासभिमुख नेतृत्व व स्वछ प्रतिमेचा उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे आल्याचे समजते. प्रविणसिंह  परदेशी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुखमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या अंत्यत जवळचे असल्याचे बोलले जात आहे. सेवानिवृत्त आयएएस अधिकारी निवडून आला तर ते केंद्रात निश्चीत मंञी होणार असल्याची शक्यता असल्याने जिल्हयाचे प्रतिनिधीत्व  थेट केंद्रात जाण्याची शक्यता आहे. प्रविणसिंह परदेशी हे विविध माध्यमातून जिल्हयातील प्रश्न सोडवत आहे. प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. तर जिल्हयात जिंदल ग्रुपचा पाच हजार मेगावँटचा विद्युत प्रकल्प आणण्यासाठी ते प्रयत्नाची पराकाष्टा करीत असुन यास यश ही मिळत आहे. यामुळे बेरोजगांरांचा हाताला काम मिळणार आहे. अप्रत्यक्षपणे ते जिल्हयातील विविध समस्या सोडविण्यासाठी काम करीत आहेत. निवडुन येण्यापुर्वीचे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी विकासाचा मुद्दावर झटणारे एकमेव्य संभाव्य उमेदवार आहेत.

 धाराशिव लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी प्रविणसिंह परदेशी यांना मिळाली तर जिल्हयाला केंद्रात प्रतिनिधित्व मिळणार असुन जिल्हयातील विकास कामे वेगाने होणार आहेत. कारण त्यांना प्रशासनाचा प्रचंड अनुभव आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बैठकीतील असल्याने याचा लाभ अप्रत्यक्ष जिल्हयाला विकासासाठी होणार आहे. 


 
Top