तेर (प्रतिनिधी)-कृषी महाविद्यालय धाराशिव येथील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने तुगाव (धाराशिव) येथे विशेष शिबीर 30 जानेवारीला आयोजित करण्यात आले होते.यावेळी तुगाव येथे स्वच्छता करण्यात आली.                                            

कृषी महाविद्यालय  येथे विशेष शिबिरा अंतर्गत 31 जानेवारीला शासकीय वैद्यकीय रुग्णालय, धाराशिव व राष्ट्रीय सेवा योजना यांच्यामार्फत कृषि महाविद्यालय धाराशिव येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी सुरुवातीला रासेयो   स्वयंसेवकांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या विषयी माहिती सांगितली. त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी तसेच विद्यार्थ्यानी 25 रक्तदात्यानी रक्तदान करून  शिबीरास उत्तम प्रतिसाद दिला. रक्तदान शिबीराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. पाटिल.  यांना रक्तदान करून केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे करण्यासाठी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. एस. वाघमारे , रासेयोचे स्वयंसेवक आणि महाविद्यालयातील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.


 
Top