तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे अखंड हरिनाम सप्ताह व छत्रपती शिवाजी महाराज शौर्यकथेस उत्साहाने 1 फेब्रुवारीला प्रारंभ झाला.  अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ पृथ्वीराजसिंह  पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.                  

यावेळी श्री संत गोरोबा काका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्माकर फंड, ॲड.रविंद्र बारवडे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ रूपाली कोरे, सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, साहेबराव सौदागर, ॲड.गजानन चौगुले, हभप. दत्तात्रय महाराज अंबीरकर, प्रविण साळुंके, हभप रघुनंदन महाराज पुजारी, हभप महेश महाराज भोरे, अजित कदम, उमाकांत शिंदे, सुधाकर बुकन, सचिन डोंगरे, नवनाथ पसारे, बालाजी नाईकवाडी, विलास फंड, बालाजी पांढरे,धनराज पवार, विजयकुमार खांडेकर, रामा कोळी, संजय लोमटे, पांडुरंग कोळेकर, सतिश थोडसरे, नंदकुमार नाईकवाडी, अलंकार रोहीदास, महादेव आगाशे, काकासाहेब मगर, कल्याण कानडे, तानाजी आंधळे, विष्णू एडके, किशोर काळे व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.


 
Top